शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९८ जागांवर प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 7:56 PM

शैक्षणिक सत्राला १० नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

जालना : जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाली असून, १० नोव्हेंबर २०२४ पासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. यासाठी वेळेत कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, पुढील १० दिवसांत विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे अधिष्ठाता यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. महाविद्यालयात ९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेण्यासाठी १०० जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत ९८ जागांवर प्रवेश निश्चित झालेले आहेत. यात परराज्यातील १५ विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे केवळ दोन जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले. घाईगडबडीत मंजुरी मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी जागा मिळविणे हे प्रशासनासमोर सर्वांत मोठे आव्हान होते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रशस्त इमारत मिळालेली आहे. असे असले तरी त्या इमारतीमध्ये वेळेत शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध होणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहे.

शैक्षणिक सत्राला सुरुवात होण्यापूर्वी प्रशासनाकडून तयारी केली जात असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना बसण्याकरिता लागणारे बाकडे, डिजिटल बोर्ड, कँटीन सुविधा, डिजिटल ग्रंथालय यासह इतर शैक्षणिक सुविधा वेळेवर मिळणार का? हे पुढील दहा दिवसांतच कळणार आहे.

१० नोव्हेंबरपासून सत्राला सुरुवातशंभर पैकी ९८ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबरला वेलकम पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, १० नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक सत्राला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये डिजिटल बोर्ड आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांचे काम पूर्ण होईल.- डॉ. सुधीर चौधरी, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, जालना.

टॅग्स :JalanaजालनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र