लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रतिकूल परिस्थिती लहान मुलांना घडवते. फक्त त्या परिस्थितीचे संस्कार मुलांवर संस्कार टाकता आले पाहिजे. आणि जी गोष्ट वेळेवर भेटत नाही त्या गोष्टीचे मोल अधिक असते. म्हणून खेळणे, मोबाईल किंवा इतर जीवनावश्यक नसलेल्या गोष्टी मुलांना देऊ नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन जालना व जेमस्टोन वर्ल्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून उद्बोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.पुढे बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले की, सतत कर्तव्यावर असतांना पोलीस बांधवाचे पाल्याकडे दुर्लक्ष होत असते. परिणामी पोलिसांचे पाल्य जिवनात, शिक्षणात यशस्वी होतांना दिसत नाही. म्हणून पोलीस पालकाने किंवा वडील घरात नसतांना मातेने मुलाकडे लक्ष देणे गरजेचे असल्यामुळे आधुनिक काळात मुलाच्या जडण घडणीत पालकांची भूमिका महत्वाची ठरते, असेही ते म्हणाले.याप्रसंगी बाबासिंह बायस, कुंदन नेमाडे, किशोर खरात, कल्याण खराबे, पोनि. घायवट, आर. डी. राजपूत, देशपांडे, मंजुषा बायस, सत्यनारायण वैष्णव, कैलास तिडके, बी. एन. खरात, एकनाथ काकड,आर. आर. रोडे, देविदास बिºहाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. डॉ. बी. वाय. कुलकर्णी म्हणाले की, मुलांना वाईट लेबल न लावता त्यांच्याशी आशावादी बोलले पाहिजे व छोटे- छोटे निर्णय मुलांना घेवू दिले पाहिजे. तेव्हा मुले निर्भिड आणि आशावादी बनतील तसेच मुलांवर संस्कार टाकतांना पालकांनी स्वत : संस्कार क्षम बनायला पाहिजे.
प्रतिकूल परिस्थिती मुलांना घडवते- एस. चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:34 AM