शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लोकसभा निवडणूक निकलानंतर जि.प.मध्ये सत्तांतराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:10 AM

राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घालून फिरत असतानाच शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जालन्यातही त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना हे स्वतंत्र लढले. मात्र नंतर त्यांचे संख्या बळ हे बहुमताच्या जवळ होते. मात्र, शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने हातावर घड्याळ बांधले. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे शिवसेनेचे अनिरूध्द खोतकर तर उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे चालून आले. भाजपचे संख्या बळ हे शिवसेनेच्या तुलनेत जास्त असल्याने भाजपने अध्यक्षपदावर दावा केला होता.जालना जिल्हा परिषदेत काही मोजका काळ वगळता शिवेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यातही अनिरूध्द खोतकर आणि जिल्हा परिषद हे समीकरणच बनले आहे. कुठलीही जोड-तोड केली तरी अनिरूध्द खोतकर हे एक तर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष राहिले आहेत. दरम्यान, शिवसेना - भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली होती. त्यामुळे तेव्हाच शिवसेना राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढेल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. मध्यंतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. परंतु यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केल्याने खोतकर यांनी माघार घेत, दानवेंचा प्रचार केला.आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. दानवे हे पुन्हा विजयी होतील, या आशेवर शिवसेना आणि भाजपने जिल्हा परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. काही चमत्कार होऊन येथे कॉग्रेसला संधी मिळाल्यास महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था तरी आपल्या ताब्यात राहावी म्हणून भाजप आणि श्विसेना नेतृत्वाकडून चाचपणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथील दानवेंच्या निवासस्थानी भेट देऊन व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. यावेळी भाजपला अध्यक्षाची संधी देऊन अनिरूध्द खोतकर हे उपाध्यक्ष पदावर समाधान मानतील, असे समीकरणही ठरल्याची जोरदार चर्चा आहे.निकालाकडे लागले जालनेकरांचे लक्ष, तर्क-वितर्कांना उधाणजस-जशी २३ मे जवळ येत आहे, तशी निकालाविषयी जोरदार चर्चा रंगत आहेत. कोणाला कुठून प्लस आणि कोणाला आघाडी मिळाली या बद्दल जो तो आपल्या परीने तर्क-वितर्क लावताना दिसून येत आहेत. पैठण, फुलंब्री बदनापूर येथे काँग्रेसला चांगले मतदान झाल्याचे बोलले जात आहे. तर जालना शहरासह विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आता मतमोजणीला केवळ पाच दिवस शिल्लक असताना जिल्हा परिषदेतील या सत्तांतराच्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान गेल्या पाच वर्षाचा कालावधी लक्षात घेतल्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपवर प्रखर टीकेचे बाण सोडल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे आ. राजेश टोपे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मध्यवर्ती बँकेतील युतीही सर्वश्रुत आहे. आज शिवसेनेने जिल्हा परिषदेत काँग्रेसचीही अप्रत्यक्षपणे साथ घेतलेली आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदPoliticsराजकारण