रांजणी : कोकण विभागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शनिवारी रांजणी येथे मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीतून १५ हजार रुपये गोळा झाले असून, ही मदत पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली आहे.
मागील आठवड्यात कोकण विभागात अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी शनिवारी जमियत उलमा - ए - हिंदच्या वतीने रांजणी येथे मदतफेरी काढण्यात आली होती. या मदतफेरीत ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. सर्व नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मदतफेरीतून १५ हजार रुपये जमा झाले असून, जमियत उलमा - ए - हिंद रांजणी शाखेच्या वतीने ही रक्कम जालना कार्यालयात पाठविण्यात आली. याप्रसंगी जमियत उलमा - ए - हिंदचे अध्यक्ष मौलाना असदुल्ला, असलम कुरेशी, उपाध्यक्ष शोएब काजी, अब्दुल रहिम सर, फ़रहत बेग, हाफिज अब्दुल रौफ, नईम फारुकी, शेख तौफिक, जुनेद कुरेशी, शेख सिकंदर, शेख रशीद, आवेज अली, तौफिक बागवान, मोईन तांबोळी, हाफिज शेख खालीद, मेहबूब बागवान आदींची उपस्थिती होती.