शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सगळं काही हिरावलं, तरीही आनंदाने जगतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:27 AM

लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.

ठळक मुद्देरत्नमाला चव्हाण : गांधी विचार शिबिरात सांगितले एचआयव्हीनंतरचे अनुभव

जालना : लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू असताना एचआयव्हीने आनंदच हिरावून घेतला. या आजारामुळे आधी नवरा आणि नंतर मुलगा गेला. त्यामुळे जगण्याची उमेदच गेली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यातून वाचले. या धक्क्यानंतरही आज आनंदाने आयुष्य जगत असताना इतरांनाही मदत करत आहे, असे मनाला गोठवून टाकणारा अनुभव जामखेड येथील रत्नमाला चव्हाण-जाधव यांनी कथन केला.जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित १४ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात ‘माझा जीवन अनुभव’ या अनुभव कथनात त्या शुक्रवारी बोलत होत्या. रत्नमाला म्हणाल्या, अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खंडेश्वरी नावाचे माझे गाव. वयाच्या पंधराव्या वर्षी पनवेल येथील एका वाहनचालकाशी माझे लग्न झाले. आनंदाने संसार सुरू असताना दीड वर्षानंतर पती सारखे आजारी पडू लागले. बाळंतपणासाठी माहेरी आले असता नवºयाची प्रकृती खालावली. बाळांतपणानंतर मी मुलाला घेऊन सासरी गेले. नवºयाला एचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यानंतर मला धक्काच बसला. त्यानंतर मलाही एचआयव्ही संक्रमण झाल्याचे निष्पण्ण झाले. सोसायटी सोडून नवºयाच्या गावी आलो. तिथेही त्रास झाला. शेतात राहायला गेलो. प्रकृती खालावल्याने २००१ मध्ये पतीचा मृत्यू झाला. पती गेल्यानंतर माहेरी आले. आईसोबत राहू लागले. तिला आजाराबद्दल कळल्यानंतर तिनेही नाकारले. गावात कुणी कामही देईना. एकेदिवशी अकरा महिन्यांचे बाळ मरुन पडलेले होते. नवरा गेला, मुलगाही गेला, मग जगायचे कशासाठी म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातच जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात काम करणाºया एका आरोग्य सेविकेने माझा परिचय डॉ. रजनीकांत आरोळे यांच्याशी करून दिला. औषधोपचार सुरू झाले. डॉ. आरोळे यांनी माझी मुलीप्रमाणे काळजी घेतली. जन्मदात्या आईने नाकारले, सासू-सासºयांनी घराबाहेर काढले.समाजाने हेटाळणी केली. मात्र, डॉ. आरोळेंसारख्या देवदुताने मला जगण्याचा एक प्रकाश किरण दाखवला, असे मनाला गोठवून टाकणारे अनुभव रत्नमाला यांनी सांगितले. त्यांची ही संघर्ष कहाणी ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.