लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : पहाट झालेली. सूर्यदर्शनाला वेळ असली तरी थंडीने हुडहुडी भरलेल्या शहागडच्या बस स्थानकात दररोजचा गोंगाट सुरू झालेला. पण, काही वेळानंतर सगळ्यांना धडकीच भरली. कॅन्टीन चालकासह प्रवाशांची नजर एका बेवारस बॅगवर पडली. धावपळ झाली. पोलिसांनी बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात कागदपत्रे आढळली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.अंबड तालुक्यातील शहागड बसस्थानकात शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बेवारस बॅग काही प्रवासी व कॅन्टीनचालक शफीक तांबोळी यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे प्रवाशांत भिती पसरली. दरम्यान, पोलीस प्रशासनाशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळत नसल्याने पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्याशी संपर्क साधून शहागड बसस्थानकातील बेवारस बॅगबाबत माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना ओेदश दिल्यानंतर गोंदी पोलीस ठाण्याचे एपीआय अनिल परजने, पो.कॉ. मुळूक व अन्य घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बॅग ताब्यात घेत तपासणी केली. बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे व कपडे मिळाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
..अन् प्रवाशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:40 AM