लोकमत न्यूज नेटवर्कजालना : टॉमीच्या मदतीने शटर उचकटून अंबड येथील बॅँक आॅफ महाराष्ट्रची शाखा फोडण्याचा चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक कुंदन टिकाराम वल्के (५६, रा. शिक्षक कॉलनी, अंबड) यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अंबड येथे बॅँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. बुधवारी सायंकाळी बँकेचे कर्मचारी बँक बंद करून निघून गेले होते. बँकेत सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री बँकेचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून एटीएम मशिनचा दरवाजा तोडला. बँकेत असलेली रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सपोउपनि. शेळके करीत आहेत.
अंबडला बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:26 IST