कोरोना हा सर्वांसाठीच नवा होता. त्यामुळे त्यावर मात कशी करायची हा जागतिक आरोग्य संघटनेसमोर प्रश्न होता. आपण तर त्यावेळी बाराखडीच गिरवित होतो. परंतु आहेत, त्या संसाधनांचा आणि शक्तिवर्धक गोळ्या देऊन रुग्णांना आलेला अशक्तपणा कमी करणे, जास्त गंभीर रुग्ण असल्यास रेमडेसिविर देणे, परंतु हे रेमडेसिविरचे इंजेक्शन शिवाय देेखील अनेक पर्यायी इंजेक्शन देऊन त्यांनी कोरोना रुग्णांना ठणठणीत केले आहे.
आज ते कोविड रुग्णालयाप्रमाणेच खासगी रुग्णातयातही कन्सल्टंट म्हणून रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळे एका वर्षभरात एखाद्या अभिनेत्यासह नेत्यांना मागे टाकतील एवढ्या प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. प्रसिद्धी मिळूनही त्यांचे पाय आजही जमिनीवर असल्याचे त्यांची भेट घेतल्यावर त्यांच्या कामाचा आढावा घेतल्यास दिसून येतात.
चौकट
सहकाऱ्यांची साथही मोलाचीच
आपण काही देवदूत नाही. परंतु आपल्या हातून जे-जे काही शक्य आहे तेवढे चांगले करण्याचा आपण प्रयत्न करतो. वडील उत्तमराव राठोड वकील असल्याने घरी नेहमीच नागरिक तसेच पक्षकारांचा राबता असत. लहान वयापासूनच आई-वडिलांचे संस्कार महत्त्वाचे ठरले. वैद्यकीय शिक्षणातील पदव्युत्तर पदवी पूर्ण झाल्यावर शासकीय रुग्णालयात दाखल झालो. तेथे माझे सहकारी डॉ. प्रशांत बादल, डॉ. उमेश जाधव, डॉ. उमेश वैष्णव असे आम्ही सर्व जण वर्षभरापासून कोविडशी उपचाररूपी लढा देत आहोत. त्याामुळे हे यश माझे एकट्याचे नसून, आमचे वरिष्ठ डॉक्टर तसेच सर्व टास्क फोर्समधील तज्ज्ञ, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची साथ महत्त्वाची ठरली.
डॉ. आशिष राठोड, जालना