येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात बीए इंग्रजी पूर्ण केलेल्या अनिता रायमल ही मूळची आंतरवाली राठी येथी रहिवासी असून, वडिलांकडे शेती नाही. घरात बहीण भाऊ असे मोठे कुटुंब आहे. आई-वडिलांनी अशाही स्थितीत शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. इयत्ता सातवीपर्तंतचे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या गावाकडील शाळेत झाले. त्यावेळी तेथे असलेले शिक्षक गाडेकर आणि सरोदे या शिक्षकांनी मोलाची मदत केली. त्यावेळी या दोन शिक्षकांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले.
इयत्ता बारावीमध्ये विज्ञान शाखेत होते. परंतु नंतर बी. ए. घेतले. त्यात नियमितच्या इंग्रजी विषयासह ऑफशनल इंग्रजी विषय निवडला. त्यात प्रथम, द्वितीय वर्षात पाहिजे तशी प्रगती नव्हती. त्यामुळे चांगली प्रश्नपत्रिका सोडवूनही गुण का मिळत नाहीत. याचा अभ्यास केला. युट्यूबची मदत केली. विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. गायकवाड, प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील यांची मोलाची साथ यावेळी मला मिळाली.
कमवा आणि शिका या योजनेत मला सहभागी करून घेतले. त्यातून दर महिन्याला ६०० रुपये मिळत होते. त्याचा मोठा लाभ झाला. एकूणच इंग्रजी विषयाची एकाच वेळी दोन सुवर्ण पदके अर्थात शिक्षणमहर्षी बापूजी सोळुंके आणि विद्याताई भुजंगराव कुलकर्णी यांचा त्यात समावेश आहे.
चौकट
प्राध्यापक होऊन विद्यादान करण्याचे ध्येय
आज सर्व शिक्षकांचे सहकार्य मिळाल्याने मी हे सोनेरी यश मिळवू शकले. आगामी काळात एमए इंग्रजी करून बीएड तसेच सेट, नेट परीक्षा देणार आहे. या परीक्षेत यश मिळाल्यावर भविष्यात चांगली शिक्षिका होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे स्वप्न आहे.
अनिता रायमल, सुवर्णपदक विजेती विद्यार्थिनी, जालना