शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

आणखी एक धरण धोकादायक स्थितीत ? भोकरदनमधील धामना धरणाच्या सांडव्यातून पाणी गळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:46 PM

पाणी गळतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण

भोकरदन (जालना ) : भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामना धरणाच्या सांडव्याला पडलेल्या भेगातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने परिसरात धरण फुटण्याची चर्चेने जोर धरला आहे. धरणाच्या खालील भागातील शेलुद, लेहा, पारध खु, पारध बु व बुलढाणा जिल्यातील म्हसला या गावाला याचा धोका असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे  जुई व धामना धरणात चांगला पाणी साठा आला आहे मात्र 2 जुलै रोजी  या दोन्ही धरणाच्या वरच्या भागात धुव्वाधार पाऊस झाला त्यामुळे ही दोन्ही धरणे 85 टक्के भरली आहेत मात्र धामना धरणाच्या सांडव्यापर्यंत पाणी आले व रात्री पासूनच सांडव्याच्या खालच्या बाजूस पडलेल्या बोगद्यातून 5 ते 6 ठिकणातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जात आहे. त्यामुळे या परिसरात धरण फुटण्याची चर्चा सुरू झाली व नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. खालच्या बाजूस असलेल्या काही गावात  खबरदारीसाठी दवंडी देण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हाअधिकारी रवींद्र बिनवडे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, तहसीलदार संतोष गोरड, कनिष्ठ अभियंता एस जि राठोड आदी अधिकारी धरणाच्या पाहणीसाठी निघाले आहेत.

डागडुजीकडे दुर्लक्ष धामना धारण 1972 साली पूर्ण झाले आऊन या धरणाची पाणी साठवण क्षमता10.72 द.ल.घ. मी एवढी आहे धरणात सध्या 9.2 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. या धरणामुळे जवळपास 1 हजार 788 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र 2013 पासून धरण भरले नसल्याने पाटबंधारे विभागाचे याच्या डागडुजीकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. 

धरण फुटण्याची शक्यता नाही कनिष्ठ अभियंता एस जि  राठोड यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण, धरणात जर पाणीसाठा जास्त झाला तर तो सांडव्यातून नदीपात्रात सोडण्यात येतो. त्यामुळे धरण फुटण्याची शक्यता मुळीच नाही. सांडव्याच्या भिंतीला काही ठिकाणी पडलेल्या भेगातून पाणी गळती सुरु आहे. गळती बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास न ठेवू नये.

टॅग्स :DamधरणWaterपाणीJalanaजालना