शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अंतरवाली सराटी दगडफेक: अंबड पोलिसांकडून तिघांना अटक; गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:43 PM

तिन्ही आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

वडीगोद्री/अंबड: अंतरवाली सराटी येथे पोलिस व मराठा आंदोलक यांच्यात झालेला लाठीहल्ला व दगडफेकीच्या घटनेत पोलिसांनी ऋषिकेश बेदरे आणि तर दोघे अशा तिघांना अटक केली आहे. बेदरेकडून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक साधा मोबाइल जप्त केला असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर रोजी झालेल्या लाठीहल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व महसूल अधिकारी यांच्याशी हुज्जत घालून पोलिसांना जिवे ठार मारण्याचा कट रचणे, पोलिसांवर दगडफेक करून गंभीर जखमी करणे, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून खाजगी वाहन जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व संबंधित प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ऋषिकेश बेदरे (रा. गेवराई, जि. बीड) याचे पहिले नाव आहे. त्याच्यावर कलम ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातीलच आरोपीचा तपास घेत असताना ऋषिकेश कैलास बेदरे व दोघांकडे २० हजार रुपये किमतीचे गावठी लोखंडी धातूचे पिस्टल, २०० रुपये किमतीचे ७.६५ एमएमचे दोन जिवंत काडतुसे, १ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा मोबाइल, असा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींना न्यायालयीन कोठडीतपासानंतर २४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी चार संशयित आरोपींना बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेतले. यातील तिघांना अंबड येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयात आज सकाळी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली. तर एका आरोपीबद्दल ठोस पुरावे मिळाले नसल्यामुळे त्याला नातेवाईकाच्या हवाली करण्यात आले.

हा कुठला डाव ?अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात पोलिसांनी दोन महिन्यांनी तिघांना अटक केली आहे, या अटकेवर मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या लोकांना अटक करण्याचा हा कुठला डाव ? असा सवाल केला आहे. 'सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक केली.अंतरावली सराटीत आमच्यावर हल्ला झाला. आम्ही कट रचला नव्हता' असे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलCrime Newsगुन्हेगारी