ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापपर्यंत जनगणना करण्यात आली नसल्यामुळे ओबीसी समाजावर देशभर मोठा अन्याय झालेला आहे. आणि तसेच ओबीसीला आरक्षण देतांना त्यांचे पूर्ण हक्क आणि अधिकार देण्यात आलेले नाही. राज्यामध्ये बारा बलुत्तेदार आणि अलुतेदार आणि तसेच भटक्के विमुक्त समाजाला शैक्षणिक, आर्थिक, उन्नतीपासून जाणून बुजून रोखण्यात आले आहे. त्यांच्या सर्वागिण विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा समाज प्रत्येक क्षेत्रात वंचित राहीला आहे. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी या मोचार्चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मुस्लीम, दलित ओबीसी सोशल फोरमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे, अहेमद नुर कुरेशी, लक्ष्मण हरकळ, मोहन इंगळे, अॅड. अर्शदखा बागवान, अजीम बागवान, इर्शाद कुरेशी, गंगाराम मैद, माणिक चव्हाण, रमेश नवगिरे, लक्ष्मण कोरडे, दिलीप शिंदे, मोईन पिनजारी, जावेद अली, शेख शफिक, एतेशाम मोमीन, फकरुल हसन आदिंनी केले आहे.
पूर्व तयारीसाठी आज बैठक
मुस्लीम, दलित ओबीसी सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष शेख महेमुद यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी १० वाजता अशोक नगर, जुना जालना येथे पदाधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सोशल फोरमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.