शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

कोतवाल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; १० सप्टेंबर रोजी होणार परीक्षा

By रवी माताडे | Published: August 08, 2023 1:44 PM

आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू, २३ ऑगस्ट शेवटची मुदत

मंठा : तालुक्यात कोतवालांच्या ११ जागा भरण्यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २३ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्ज केलेल्यांपैकी पात्र उमेदवारांची १० सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. महसूल विभागातील 27 तलाठी सज्जासाठी 27 कोतवालांच्या जागा मंजूर आहेत. यातील 13 ठिकाणी कोतवाल कार्यरत असून 14 जागा रिक्त आहेत. यापैकी 11 जागा भरण्यासाठी हि भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 10 सप्टेंबरला शहरातील विविध केंद्रावर लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 तर कमाल 40 वर्षे आहे, तर शिक्षणाची किमान चौथी पासची अट आहे. वेळेत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचाच विचार केला जाईल., तसेच कोतवाल पदाच्या भरतीसाठी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही., असे निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी परतूर यांनी कळवले आहे.

कोतवालांना मिळणार १५ हजार रुपये  मानधन या भरतीसाठी अर्जाची किंमत ५० रुपये असून, खुल्या वर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना ४०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. कोतवाल म्हणून निवड झाल्यास त्यांना १५ हजार रुपये प्रति महिना मानधन मिळते. 

काय आहे जबाबदाऱ्यामहसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामात मदत करणे. नोटीस तामिल करणे, पंचनाम्यासाठी मदत करणे, टपालाची देवाण-घेवाण करणे आदी जबाबदाऱ्या कोतवालाला पार पाडाव्या लागतात.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागJalanaजालना