शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

८ एप्रिलपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:52 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेस आठ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेस आठ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. व्याख्यान मालेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या व्याख्यान मालेत नामवंत साहित्यिकांसह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.८ एप्रिलपासून सुरु होत असलेल्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आ. जितेंद्र आव्हाड (मुंबई) हे देशातील सद्यकालीन परिस्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर गुंफणार आहेत. प्रमुख पाहुणे राज्यमंत्री अर्जुन खोतकर तर अध्यक्षस्थानी आ. राजेश टोपे हे राहणार आहेत. या प्रसंगी बी. एम. साळवे, प्रा. सुनील मगरे व सुनील साळवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.९ एप्रिल रोजी संभाजी ब्रिगेडचे अमोल मिटकरी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित लोकशाही व आजची वास्तविकता या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, पोनि. पल्लवी जाधव, सुधाकर निकाळजे यांची उपस्थिती राहणार आहे.१० एप्रिल रोजी मुंबई येथील रमेश शिंदे हे आंबेडकर कालीन चळवळ आणि आजच्या चळवळीतील वास्तव या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार असून यावेळी अध्यक्षस्थानी भीमराव डोंगरे, प्रमुख अतिथी म्हणून विजयकुमार पंडित, सुधाकर रत्नपारखे, शेख महेमूद आदींची उपस्थिती राहणार आहे. ११ एप्रिल रोजी आयुष्यमती रमा अहिरे (मुंबई) या जागतिकीकरणात महिलांसमोरील आव्हाने या विषयावर चौथे पुष्प गुंफणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल तर प्रमुख अतिथी म्हणून विमल आगलावे, खमर सुलताना, कुसुम रगडे उपस्थित राहतील. १२ रोजी कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे हे भारतीय समाज व्यवस्थेला विद्रोहाचे तत्वज्ञान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याविषयावर पाचवे पुष्प गुंफणार आहेत. दरम्यान डॉ. संजय लाखे पाटील, गणेश रत्नपारखे, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे आदींची उपस्थिती राहणार आहे.१३ एप्रिल रोजी शाहिरी भीमदर्शन हा अप्पा तात्या उगले आणि सहकाऱ्यांच्या कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी दिलीप काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. शिवाजी आदमाने, बाबूराव ससाणे, हरिभाऊ उघडे, एन. डी. गायकवाड, डॉ. जे. एस. कीर्तीशाही, प्रमोद रत्नपारखे, सुधाकर निकाळजे, बबन रत्नपारखे, दीपक डोगे, डॉ. रवींद्र काकडे, परमेश्वर गरबडे, प्रमोद गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, भास्कर मगरे, महेंद्र रत्नपारखे यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून कल्याण दळे, कॉ. सगीर अहेमद, सुनील आर्दड, गणेश राऊत, शेख महेमूद, महावीर ढक्का, विजय चौधरी, रमेश गोरक्षक, विनोद रत्नपारखे, राहुल हिवराळे, संदीप खरात, अशोक पवार, निखिल पगारे, जीवन सले, जगदीश भरतिया, राजेंद्र वाघमारे, अकबर इनामदार, इकबाल पाशा, शाह आलम खान, विनोद यादव, राम सावंत, राजू सरोदे, विष्णू पाचफुले, चंपालाल भगत, अशोक पांगारकर, किशोर पांगारकर, राधाकिसन दाभाडे, विजय कांबळे, अमजदखान नवाबखान आदींची उपस्थिती राहणार आहे.हा कार्यक्रम शहरातील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. या व्याख्यान मालेस शहर व पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंबेडकरी विचारांचे श्रवण करावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष माजी आ. कैलास गोरंट्याल, अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे, कार्याध्यक्ष योगेश रत्नपारखे, कोेषाध्यक्ष वैभव उगले, उपाध्यक्ष नंदा पवार, एम. पी. पवार, कैलास रत्नपारखे, विलास रत्नपारखे, सिमोन सुतार, दिनकर घेवंदे आदींनी केले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती