जालना : राज्याचे लक्ष लागलेल्या जालना विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ३१ हजार ६५१ इतक्या मताधिक्याने बाजी मारली. तर काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा दारुण पराभव झाला.
जालना विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २६ उमेदवार उभे होते. त्यातही काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल, शिंदेसेनेकडून अर्जुन खोतकर यांच्यातच सरळ लढत होत होती. त्यातही वंचितचे डेव्हिड घुमारे, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडत वातावरण चांगलेच तापविले होते. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत जालना विधानसभा मतदार संघात ६४.३९ टक्के मतदान झाले होते. तर शनिवारी झालेल्या मतमोजणीनंतर या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला असून, शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ३१ हजार ६५१ मते अधिक घेत विजय मिळविला. खोतकर यांना १ लाख ४ हजार ६६५ इतकी तर पराभूत उमेदवार गोरंट्याल यांना ७३ हजार १४ मते मिळाली आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांना ३० हजार ४५४, वंचितचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांना ६,३२२, भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर यांना २,२२७ मते मिळाली. एकूणच या निकालानंतर अर्जुन खोतकर, अभिमन्यू खोतकर यांच्यासह महायुतीतील मित्र पक्षांच्या पदाधिकारी, समर्थकांसह शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. मतमोजणी केंद्रासह खोतकर यांच्या निवासस्थान परिसरातही एकच जल्लोष केला जात होता. खोतकर समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागात एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
विजयाची तीन कारणे१. महायुती सरकारने राबविलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सरकारबाबत सकारात्मक दृष्टिकोन.२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्जुन खोतकर यांना पाठबळ देत विकास कामांसाठी दिलेला भरघोस निधी.३ मित्रपक्ष भाजपचे रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अरविंद चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत दिलेल्या पाठबळामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला.
गोरंट्याल यांच्या पराभवाचे कारण...काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव झाला. तर काँग्रेस पक्षातील बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांनी ३० हजार ४५४ मते घेतली. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत निकाल लागेल, ही मविआची आशा विधानसभेच्या निकालात फोल ठरली.
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मतेअर्जुन पंडितराव खोतकर शिवसेना १,०४,६६५किशार यादव बोरुडे बहुजन समाज पार्टी ९००कैलास किसनराव गोरंट्याल इंडियन नॅशनल काँग्रेस ७३,०१४असदउल्ला शेख अमान सोशल डेमोक्रॅटिकउल्ला शहा पार्टी ऑफ इंडिया ८६९डेव्हिड प्रल्हादराव घुमारे वंचित बहुजन आघाडी ६३२२नीला गाैतम काकडे विकास इंडिया पार्टी १३१मिलिंद बालू बोडे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ३६३ॲड. योगेश दत्तू गुल्लापेल्ली ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक ९२विकास छगन लहाने पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) १४९विजय पंडितराव वाढेकर संभाजी ब्रिगेड पार्टी १३१विनोद राजाभाऊ मावकर राष्ट्रीय समाज पक्ष ९८अन्वर कुरेशी सलीम कुरेशी अपक्ष १०८अनिस शमशोद्दीन सय्यद अपक्ष १५७अफसर फरिदशेख चाैधरी अपक्ष ५२८अब्दुल हफिज अब्दुल गफ्फार अपक्ष ३०,४५४अर्जुन दादा पाटील भांदरगे अपक्ष ९८५अर्जुन सुभाष कणिसे अपक्ष ६८८अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर अपक्ष २२२७आनंदा लिंबाजी ठोंबरे अपक्ष २७०कुंडलिक विठ्ठल वखारे अपक्ष ११८गणेश दादाराव कावळे अपक्ष १०८योगेश सखाराम कदम अपक्ष १०३रतन आसाराम लांडगे अपक्ष ५१विशाल लक्ष्मण हिवाळे अपक्ष १२३सपना विनोद सुरडकर अपक्ष १०१ॲड. संजय रघुनाथ राैंदळे अपक्ष ३७२