गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसणारा अटकेत
जालना : गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्यास पोलिसांनी अटक केली आहे. गलाबसिंग कोंडीसिंग ठाकूर (रा. वडीगोद्री. जालना) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी रामलाला कांगणे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना. साळवे करीत आहेत.
सोलार प्लेट्स चोरी : तालुका जालना पोलिसांत गुन्हा दाखल
जालना : एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीजवळून २० सोलार प्लेट्स कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जालना तालुक्यातील पिरकल्याण येथे घडली. या प्रकरणी नारायण शिंदे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अंबड येथे दुकान फोडले : गुन्हा दाखल
जालना : अंबड शहरातील जय ट्रेडर्स नावाचे दुकान फोडून चोरट्यांनी १ लाख ३४ हजार २०० रुपयांचे सिगारेट चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी सचिन गुप्ता यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दुचाकी खरेदीसाठी आला अन् चोरून घेऊन गेला
जालना : जुने वाहन खरेदी-विक्रीच्या दुकानात दुचाकी खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने दुचाकी चालवून पाहतो, असे म्हणून दुचाकी लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी फरीद अहेमद अब्दुल हमीद यांच्या फिर्यादीवरून बाळू शंकर भोई (रा. विठ्ठल कॉलनी, ता.जि. जळगाव) व लक्ष्मण पाटील (रा. बुलढाणा) यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.