लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एक किलो ३०० ग्रॅम बनावट सोने खरे असल्याचे भासवून विकण्याचा प्रयत्न करणाºया एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. ईश्वर चमनाजी वागरी (२५) रा. पावली ता. जसनपूरा, जि. जालोर (राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांना खब-यामार्फत माहिती प्राप्त झाली की, भाजीमंडी परिसरात गुप्त धन सोन्याचे दागीने कमी किमतीत विक्री करण्यासाठी दोन जण ग्राहकांचा शोध घेत आहेत. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सोने खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. याची माहिती आरोपींना लागताच ते तेथून पळून जावू लागली. दरम्यान पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांपैकी एकास ईश्वर चमनाजी वागरी (२५) रा. पावली ता. जसनपूरा, जि. जालोर (राजस्थान) याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो ३०० ग्रॅम वजनाचा पिवळ््या धातूचा सोन्याची पॉलीश केलेजा एक हार पोलिसांना आढळून आला.ही कारवाई मोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पह पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोनी. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंह परदेशी, संजय मगरे, रामेश्वर बघाटे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, समाधान तेलंग्रे, सचिन चौधरी, लखन पचलोरे, परमेश्वर धुमाळ, विलास चेके, रामदास जाधव, मंदा बनसोडे आदींना केली.
बनावट सोने विकणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:21 AM