शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

‘तान्हाजी’ चित्रपटात झळकला चांधई टेपली येथील मावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 1:11 AM

देशात एका आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय मिळविणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात चुलत्याची भूमिका करणारा सिनेअभिनेता भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावातील आहे.

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : देशात एका आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय मिळविणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात चुलत्याची भूमिका करणारा सिनेअभिनेता भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावातील आहे. त्याचे मराठी नाटक, मराठी सिनेमातून चक्क हिंदी चित्रपटात पदार्पण झाले आहे. कैलास वाघमारे असे या अभिनेत्याचे नाव आहे.भोकरदन तालुक्यातील राजूर जवळ असलेल्या चांदई ठोंबरी येथील एका शेतकरी कुटुंबात कैलास वाघमारे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामभाऊ वाघमारे हे शेती करतात. त्यांना चार मुले आहेत. यात तीन मुले व एक मुलगी आहे. यातील कैलास हा सर्वात लहान असून, त्यांचे दोन भाऊ पारंपरिक पद्धतीने शेती करतात. कैलास वाघमारे यांचे शिक्षण सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर चांदई एक्को येथील विनायक विद्यालयात आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण राजूर येथील मोरेश्वर महाविद्यालयात घेऊन पुढील शिक्षण मत्स्योदरी महाविद्यालय जालना येथे घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. तेथील विद्यापीठात एम. ए. मराठी व एम. ए. नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले.कैलास वाघमारे हे शालेय जीवनात असतानाच नाटक करायचे. त्यामुळे त्यांना शालेय जीवनातच अनेक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. कालांतराने त्यांनी मराठी सिनेसृष्टीत प्रवेश मिळविला. यात मराठीत मनातल्या उन्हात, हाफ तिकीट, किस्से बाजी, सोम शो, ड्राय डे, बाबा, मंडळ आभारी आहे, घोडा या चित्रपटांत काम केले. आता ‘तान्हाजी’ हा सिनेमा चांगलाच हिट झाला आहे. शिवाय मी केलेल्या भूमिका सुद्धा असंख्य चाहत्यांना आवडली आहे. त्यामुळे आता मी भारावून गेलो आहे. मी सिनेसृष्टीत असल्यामुळे मागील आठ ते दहा वर्षांपासून मुंबई येथे राहत होतो. मात्र, वर्षातून तीन ते चार वेळा चांदई ठोंबरी येऊन मातीशी नाते कायम ठेवत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.सिंधाना, जाधव यांच्यामुळे संधीयाबाबत कैलास वाघमारे म्हणाले, कास्टिंग दिग्दर्शक विकी सिंधाना व विजय जाधव यांच्यामुळे ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात मला भूमिका करण्याची संधी मिळाली. सुरूवातीला जेव्हा या सिनेमाचे संचालक ओम राऊत यांच्या समोर घेऊन गेले तेव्हा ‘तान्हाजी’ मध्ये कोठे तरी छोटासा रोल करण्यासाठी नेले होते. मात्र, ओम राऊत यांच्या सोबत एक दोन तास चर्चा झाली. त्यांनी मला अचानक चुलत्याची मोठी भूमिका करण्याची संधी दिलीआहे.शालेय जीवनात असताना राजूरच्या यात्रेत अजय देवगण यांचा ‘फूल और काँटे’ हा सिनेमा टूरिंग टॉकीजमध्ये खाली जमिनीवर बसून बघितला होता. यावेळी आपल्याला या पडद्यावर काम करण्याची संधी मिळेल, असा विचारही केला नव्हता. मात्र ‘तान्हाजी’मुळे ते शक्य झाले आहे. सिनेअभिनेता सैफ अली खान, सिनेअभिनेता अजय देवगण यांनी मी चुलत्याची भूमिका चांगली केल्याबद्दल पाठीवरून हात फिरविला. हा जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता.- कैलास वाघमारे, अभिनेता

टॅग्स :Tanaji Movieतानाजीcinemaसिनेमाartकला