लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात त्वरित तिपटीने वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.याप्रसंगी ४५ व्या भारतीय कामगार परिषदेच्या शिफारशी मान्य कराव्यात, कामगार म्हणून मान्यता द्यावी, आशांना विनामोबदला कोणतेही काम देऊ नये, सन्मानाची वागणूक द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांना देण्यात आले.याप्रसंगी अण्णा सावंत, मधुकर मोकळे, गोविंद आर्दड, मंदाकिनी तिनगोटे, कल्पना आर्दड, मीना भोसले, मीरा जिगे, सुजाता छडीदार, संगीता निर्मळ, आशा कांबळे, दीपा रगडे, अनिता दांडेकर, कुंदा पाथ्रकर, मंगल पवार, वदना लहाने, रेणुका सिरसाठ, संगीता बळे, ज्योती घुले, मीरा खोडवे आदींची उपस्थिती होती. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:46 AM