शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

जालन्यातील शेतकऱ्यांना ११० कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:44 AM

शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसासाठी प्रतीक्षा करावी लागली. जेमतेम पावसात शेतकऱ्यांनी खरिपाची पिके तगवली. आता केवळ सांगनी करून सोयाबीन बाजारात नेणे तेवढे शिल्लक असताना, परतीच्या पावसाने त्याची दाणादास उडवून दिली. यात सर्वात जास्त फटका सोयाबीन आणि मका पिकाला बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन चार लाख ८० हेक्टरवरील नुकसान झाले होते. यानुसार शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.जिल्ह्यात पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात मुबलक पाऊस पडला. परंतु अन्य तालुक्यात पावसासाठी शेतकºयांच डोळे आभाळाकडे लागून होते. परंतु पावसाळा संपल्यावरही या सहा तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झाला नव्हता. परंतु नंतर आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने ही पावसाची तूट भरून काढली. तूट भरून काढतांना हातातोंडाशी आलेल्या पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी ठरला. यामुळे शेतक-यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते.हे झालेले नुकसान भरून निघत नसल्याने शेतक-यांनी नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे केले. यावेळी कृषी विभाग तसेच महसूल आणि ग्रामसेवकांनी या महत्त्वाची भूमिका निभावली. जिल्ह्यातील पंचनामे केल्यावर जे नुकसान झाले आहे, त्यापोटी राज्य सरकारने जुन्या निकषानुसारच ही मदत देऊ केली आहे. राज्यात सरकार नसतांना राज्यपालांनी ही मदत जाहीर केली आहे. आता ही ११० कोटींची मदत जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यात आता ज्या तालुक्यात जास्त क्षेत्राचे नुकसान झाले, त्यानुसार त्यांचे वाटप तालुकानिहाय होऊन नंतर ते अनुदान तहसील पातळीवरून शेतक-यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.राज्यात परतीच्या पावसाने जेनुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यासाठी १३ मे २०१५ चा अध्यादेश ग्राह्य धरला आहे. त्यानुसार कोरडवाहू शेतक-यांना प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० रूपये तर, बागयायती शेतक-यांच्या नुकसानीपोटी आठ हजार रूपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीGovernmentसरकारRainपाऊस