लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दक्षिणमध्य रेल्वेच्या नांदेड विभागा अंतर्गत येणाऱ्या ३० मोठ्या रेल्वे स्थानकावर एटीएम मशिन बसविण्यात येणार आहेत. यापैकी जालना आणि नांदेड येथे एटीएम बसविण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उर्वरित रेल्वे स्थानकात एटीएम बसविण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.येथील रेल्वे स्थानक पॅसेंजर आणि जलद अशा ६४ रेल्वे गाड्यांची नियमित ये- जा असते. यामुळे हजारो प्रवाशांची वर्दळ येथील रेल्वे स्थानकात असते. अनेक वेळा रेल्वेने जाणा-या प्रवाशांचे घाईगडबडीत पैशाचे पाकीट घरीच विसरल्याच्या घटना येथील रेल्वे स्थानकात घडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक गांधीचमन पर्यंत एटीएम शोधत धावपळ करावी लागते. तसेच रेल्वे स्थानकात येणा-या बाहेरच्या राज्यातील प्रवाशांना सुध्दा पैशाची चणचण भासल्यास एटीएम अभावी त्यांची सुध्दा मोठी गैरसोय होत आहे. याबाबत दक्षिणमध्ये रेल्वेचे महाप्रबंधकांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. यामुळे दक्षिणमध्ये रेल्वेच्या नांदेड विभागा अंतर्गत येणाºया ३० मोठ्या रेल्वे स्थानकावर एटीएम मशिन बसविण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया काढण्यात आलेल्या होत्या. यात जालना येथे एक आणि नांदेड येथे दोन एटीएम मशिनची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे. तर उर्वरित रेल्वे स्थानकाची निविदा प्रक्रिया प्रगती पथावर आहे.जालना येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी एटीएमची सुविधा देण्यात यावी यासाठी रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाकडे सलग सहा वर्षापासून पाठपुरावा केला. याला आता कोठे यश आल्याने समितीच्या पदाधिका-यांनी समाधान व्यक्त केले.
जालन्यासह ३० रेल्वे स्थानकावर एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:50 AM