लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : न्यायालयातील कामकाजाला होणा-या विलंबास कंटाळून धाकलगाव (ता.अंबड) येथील सुनील सुभाष लगडे (२८,रा. पीरगैबवाडी ) या युवकाने बुधवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.सुनीलचे वडील सुभाष लगडे पीरगैबवाडी (ता.घनसावंगी) येथील रहिवासी आहे. त्यांनी बाळाभाऊ लागडे यांच्याकडून दोन हेक्टर जमीन विकत घेतली होती. त्यांनतर बाळाभाऊ यांचे वारस सुगंधा लगडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला असता, सुगंधाबाई आणि सुभाष लगडे यांची न्यायालयात तडजोड झाली. त्यानंतर सुभाष लगडे यांनी सुगंधाबाई यांना पाच एकर जमिनीची विक्री करून, त्या पैशातील गावात म्हशी घेऊन दूध व्यवसाय सुरू केला. चारचाकी वाहन घेतले. व्यवसाय फसल्यामुळे सुभाष लगडे हे कुटुंबीयांसह पुणे येथे कामास गेले. त्यानंतर सुभाष व सुगंधाबाईसह उर्वरित वारसांना बाळाभाऊ यांनी उर्वरित सर्व जमीन विक्री केली. सुभाष व बाळाभाऊ दोघेही आजारपणामुळे मरण पावल्यामुळे सुनील व शीलाबाई लागडे हे पीरगैबवाडी येथून धाकलगाव येथे राहायला गेले. सुनील व शीलाबाई लगडेने विक्री केलेल्या जमिनीवर वारसाचा दावा अंबड कोर्टात २०१० ला दाखल केला.१५ वर्षापूर्वी वडिलांनी विक्री केलेल्या जमिनीवर न्यायालयात वारसा हक्क चालत नसल्यामुळे व कामास विलंब होत असल्याने सुनीलने ंकंटाळून कोर्टाच्या आवारात विषारी द्रव घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.वारसा हक्क चालत नसल्यामुळे सुनीलने कोर्टाच्या आवारात कीटकनाशक घेतले आहे. कोर्ट निकालाची पुढील तारीख २३ मार्च असून न्यायालयाच्या प्रतीक्षेत आहे. सुनीलचे वकील अॅड.अरुण काफरे व प्रतिवादीचे वकील अॅड. राजेश्वर देशमुख आहेत.
न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:39 AM