लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बदनापूर तहसील कार्यालयासमोर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासह इतर मागण्यांसाठी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबद्दल २० ते २५ पदाधिकारी व कार्यकर्त्याावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बदनापूर तहसील कार्यालयात सोमवारी छावा संघटनेने निवेदन दिले हाते. त्यात शेतक-यांच्या प्रश्नासाठी गेल्या दहा दिवसांपासून विजय घाडगे हे उपोषणास बसले आहेत, असे असताना त्यांच्या उपोषणास कोणीही भेट दिली नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी अचानक रौद््र रूप धारण करून जोरदार घोषणाबाजी करून अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सपोउपनि प्रेमदास वनारसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवकर्ण वाघ, संदीप तांगडे, कैलास कान्हारे, राम सिरसाठ, राधाकिसन शिंदे व इतरांविरूध्द १४३, ३०९ भादंविसह १३५ मपोकॉ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोउपनि शेख हे करीत आहेत.
आत्मदहनाचा प्रयत्न; पंचवीस जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 1:00 AM