लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९९.६८ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे चार तालुक्यात १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून, प्रकल्पातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १७ मिमी पाऊस झाला.मागील आठ- दहा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे प्रकल्पातील पाणीपातळी वाढू लागल्याने पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी आहे. आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६८६.४ मिमी म्हणजे ९९.६८ मिमी पाऊस झाला आहे. यात भोकरदन तालुक्यात सर्वाधिक १४०.५६ टक्के, अंबड तालुक्यात ११२.६९ टक्के, जाफराबाद- १०८.८१ टक्के, बदनापूर- १०२.५४ टक्के, परतूर- ९१.४६ टक्के, घनसावंगी- ९१.०४ टक्के, जालना तालुक्यात ८२.३७ टक्के तर मंठा तालुक्यात सर्वात कमी ७२.४९ टक्के पाऊस झाला आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासातील मंडळनिहाय पाऊस पाहता जालना महसूल मंडळात जालना- १० मिमी, ग्रामीण- ८ मिमी, रामनगर- ९ मिमी, विरेगाव- ४ मिमी, नेर- १४ मिमी, सेवली- ८ मिमी, पाचनवडगाव- ५ मिमी, वाग्रूळ जहागीर- ११ मिमी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील बदनापूर महसूल मंडळात ७१ मिमी, रोषणगाव- ८५ मिमी, दाभाडी- ६२ मिमी, सेलगाव- ६२ मिमी, बावणे पांगरी- ६० मिमी पाऊस झाला आहे.भोकरदन तालुक्यातील भोकरदन महसूल मंडळात ६० मिमी, सिपोरा बाजार- २९ मिमी, धावडा- १६ मिमी, पिंपळगाव रेणुकाई- १३ मिमी, हस्नाबाद- ५६ मिमी, राजूर- ४४ मिमी, केदरखेडा- ४९ मिमी, आन्वा- ४० मिमी. पाऊस झाला.जाफराबाद महसूल मंडळात ८ मिमी, टेंभुर्णी- ९ मिमी, कुंभारझरी- ७ मिमी, वरूड- १२ मिमी, माहोरा- १३ मिमी पाऊस झाला. मंठा तालुक्यातील मंठा- ८ मिमी, ढोकसाल- ३ मिमी, तळणी- ५ मिमी, पांगरी गोसावी- ४ मिमी पाऊस झाला.अंबड तालुक्यातील अंबड- ७ मिमी, धनगरपिंपरी- ८ मिमी, जामखेड- ४ मिमी, वडीगोद्री- ६ मिमी, गोंदी- ४ मिमी, रोहिलागड- २० मिमी, सुखापुरी- ७ मिमी पाऊस झाला. तर घनसावंगी तालुक्यात घनसावंगी- ७ मिमी, राणी उंचेगाव- ८ मिमी पाऊस झाला.गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १७.४९ टक्के पाऊस झाला आहे. यात जालना तालुक्यात ८.६३ मिमी, बदनापूर ६८ मिमी, भोकरदन- ३८ मिमी, जाफराबाद- ९.८० मिमी, मंठा- ५ मिमी, अंबड- ८ मिमी तर घनसावंगी तालुक्यात २.१४ मिमी पाऊस झाला आहे. बदनापूर महसूल मंडळात ७१ मिमी तर रोषणगाव महसूल मंडळात ८५ मिमी पाऊस झाला आहे.१० मंडळे कोरडीपरतूर तालुक्यातील परतूरसह सातोना, आष्टी, श्रीष्टी, वाटूर तर घनसावंगी तालुक्यातील रांजणी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, अंतरवली टेम्बी, जांभ समर्थ या १० महसूल मंडळात मागील २४ तासात पाऊस झाला नाही.नदीकाठच्या पाच एकर जमिनीचे नुकसानकेदारखेडा : येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे पाणी एका बाजूनेच गेल्याने नदी काठच्या पाच एकर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जमीनही खरडून गेली आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात मागील सात दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. चार दिवसांपासून त्याचा जोर वाढला आहे. यामुळे गिरजा व पूर्णा नद्यांच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली असल्याने हा पाऊस लाभदायक ठरल्याचे बोलले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोयाबीन, मका, मिरची व कपाशी इ. पिके पूर्णत: पाण्यात गेली आहेत. यामुळे ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण दिसून येत आहे. यातच येथील कोल्हापुरी बंधाºयाचे गेट टाकून पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात आले होते. परंतु, पावसाचा जोर वाढला. नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह अधिक वाढला. आणि बंधा-याच्या एका बाजूने पाणी शिरले.यात नदीकाठच्या पंढरीनाथ तांबडे, रामदास मगर, अंबादास मगर, शरद तांबडे, नसीम बेग मिर्झा, पवार आदी शेतकऱ्यांच्या पाच एकर जमिनीमधील पिके वाहून गेली आहेत. तसेच जमीनही ओरबडून गेली आहे. यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसाची सरासरी शंभरीकडे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 2:02 AM