क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर करण्यात येते. या युवा महोत्सवात शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, शास्त्रीय नृत्य व वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचा समावेश असतो. यावर्षी कोविड- १९ च्या बिकट परिस्थितीमुळे शासनाने ऑनलाईन पद्धतीने युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये श्री व्यंकटेश महाविद्यालयाचा विद्यार्थी अविनाश तळेकर याने शास्त्रीय वादन या गटात मृदंगवादन सादर करून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी उपसंचालक, क्रीडा, युवक सेवा व अमरावती विभाग यांच्या वतीने विभागस्तरावर ऑनलाईन युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, यापूर्वीही अविनाशने २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये सलग दोनवेळा राज्यस्तरावर मृदंग वादनमध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण मोगरकर यांचे मार्गदर्शन लाभले.