शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरमुक्तीवर जालीम इलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:26 PM

तंबाखू तसेच सिगारेट, विडी आणि अतिमद्यपानामुळे कॅन्सर जडण्याची दाट शक्यता असते

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तंबाखू तसेच सिगारेट, विडी आणि अतिमद्यपानामुळे कॅन्सर जडण्याची दाट शक्यता असते. यासह शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ हे देखील एक मुख्य कारण कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे मार्गदर्शन येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात करण्यात आले. महाशिवरात्री निमित्त रमाई सेवाभावी संस्थेकडून ही जाणीव जागृती करण्यात आली.महाशिवरात्री निमित्त दरवर्षी येथील पंचमुखी महादेव मंदिरात मोठी यात्रा भरते. या यात्रे दरम्यान महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. त्यामुळे ही संधी साधून रमाई संस्थेच्या अ‍ॅड. दीपाली भालशंकर कैलास जीगे, सुधाकर मुळे, जाधव यांनी कॅन्सर संदर्भातील विविध कारणे आणि त्यांची लक्षणे यावर मार्गदर्शन केले. सिगारेट, विडी आणि अति मद्यपानापसून नागरिक आणि विशेष करून युवकांनी यापासून दूर राहिले पाहिजे. कॅन्सरची लक्षणे आणि त्यावरील उपाय या बद्दलही सविस्तर माहिती दिली गेली. कॅन्सर हा ज्या प्रमाणे व्यवसांमुळे होतो, तो तसेच शरिरातील पेशींची झपाट्याने होणारी अनियंत्रित वाढ हे देखील यासाठी कारणीभूत आहे. ज्यांना व्यसन नाही अशांनाही कधी-कधी कॅन्सर झाल्याची उदाहरणे आहेत.कॅन्सरवर आज अनेक महत्वपूर्ण आणि आधुनिक उपचार निर्माण झाले आहेत. असे असले तरी हे उपाय अत्यंत महाग आणि त्यातूनही रूग्ण बरा होईल असे खात्रीशीर सांगता येत नाही. त्यामुळे नियिमित आरोग्य तपासणी करणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते. विशेष करून आहारवरील नियंत्रण हा देखील उपाय आहे. आहारात तेलकट, तूपकट पदार्थ टाळणे तसेच नियमितपणे फळांचे सेवन आणि हलका आहार हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यTobacco Banतंबाखू बंदीDrugsअमली पदार्थliquor banदारूबंदीSmokingधूम्रपान