अलिकडे बेसुमार पाणी उपसा व पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाई झळा बसू नये, यासाठी पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहन तेजसचे अध्यक्ष शिवाजी तायडे यांनी केले. कमी पाण्यात पिके घेण्यासह घरात नाहक पाणी वाया जाणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतल्यास नागरिकांना पाणी समस्येला तोंड देण्याची गरज पडणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच गावात पाणी बचत विषयी माहीती पत्रक वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजी तायडे, कडूबा तायडे, गौतम तायडे, रमेश निहाळ, संतोष हाळदे, दत्ता तायडे, रोहन मगरे, प्रल्हाद जायभाये, केशव कोल्हे, बाबू पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
060321\06jan_25_06032021_15.jpg
===Caption===
राजूर