वारंवार वाहतूक जाम
जालना : शहरातील पाणीवेस परिसरात नियमित सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वेस लहान आहे. असे असतानाही येथून दोन्ही बाजूने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. शिवाय येथे पोलिसही नसतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते.
तीर्थपुरी येथे भूगोल दिन साजरा
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील मत्स्योदरी महाविद्यालयात जागतिक भूगोल दिन नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पृथ्वीगोलाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर पृथ्वी या डिजिटल भित्तीपत्रकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक शिवराज लाखे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती.
मुर्तीत मुला- मुलींची आरोग्य तपासणी
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील मुर्ती येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात किशोरवयीन मुला- मुलींची तपासणी करण्यात आली. ही तपासणी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन दाड, डॉ. हर्षदा कोल्हे यांनी केली. ग्रामीण रूग्णालयाचे घनसावंगी येथील समुपदेशक लहु मिसाळ यांनी मुला- मुलींना आरोग्यबाबत घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.