लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी कारवाई केली. यात ३६१ ब्रास वाळूसह दोन ट्रॅक्टर असा १६ लाख ६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना गुप्त माहिती मिळाली की, बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथे आप्पासाहेब ओंकार उगले यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा करुन ठेवून त्याची विक्री केली जात आहे.या माहितीवरुन सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता, मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा मिळून आला. याबाबत आप्पासाहेब ओंकार उगले (३२ रा. कुंभारी ता. बदनापूर) यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, सदर वाळूसाठा माझा असून, त्याचा परवाना नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर महसूलचे पथक बोलवून सदर वाळूचा पंचनामा करुन २१२ ब्रास वाळू व दोन ट्रॅक्टर असा ११ लाख ५६ हजार ७२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच कुंभारी येथील गायरान जमिनीवर साठवून ठेवलेली ४ लाख ४९ हजार ७०० रुपयांचा १४९ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. दोन्ही ठिकाणांहून ३६१ ब्रास वाळू व वाळूची चोरटी विक्री करणारे दोन ट्रॅक्टर असा १६ लाख ६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या फिर्यादीवरुन आप्पासाहेब उगले यांच्या विरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोउपनि. राजपूत करत आहेत.
वाळूमाफियांविरूद्ध बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:25 AM