बाळासाहेबांचा राजीनामा दुर्दैवी; अशोक चव्हाण यांनी सांगितली पुढील रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 02:34 PM2023-02-07T14:34:43+5:302023-02-07T15:24:08+5:30

विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला.

Balasaheb Thorat's resignation is unfortunate; Ashok Chavan told the next strategy | बाळासाहेबांचा राजीनामा दुर्दैवी; अशोक चव्हाण यांनी सांगितली पुढील रणनिती

बाळासाहेबांचा राजीनामा दुर्दैवी; अशोक चव्हाण यांनी सांगितली पुढील रणनिती

googlenewsNext

जालना - महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काही दिवसांपासून दुफळी किंवा फूट पडल्याचे बोलले जात होते. दरम्यान, राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. काही दिवसांपूर्वी आपले राज्याचे पक्षाध्यक्षपद सोडणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी आज विधिमंडळ पक्षनेते पदाचा अचानक राजीनामा दिला. तशातच हा प्रकार घडला असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणी नाना पटोले यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही हे दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. तसेच, बाळासाहेब हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि संयमी नेते असल्याचंही ते म्हणाले.  

विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेस नेतेबाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. त्यामुळेच, हा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. आता याप्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी अशोक चव्हाण यांनी आपण पुढाकार घेऊन पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचं म्हटलं आहे. 

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब हे पक्षाचे वरिष्ठ आणि संयमी नेते आहेत. विशेष म्हणजे आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेईन, काँग्रेस पक्ष वाढीसाठी जे करावं लागेल ते सर्वकाही करणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच, थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी ठामपणे व्यक्त केला. 

बाळासाहेबांसोबत आमचा संपर्क नाही

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला. बाळासाहेब थोरातांशी आमचा संपर्क होत नाही, ते आमच्याशी बोलतच नाहीत, असा खुलासा नाना पटोलेंनी केला.

Web Title: Balasaheb Thorat's resignation is unfortunate; Ashok Chavan told the next strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.