शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन

By विजय मुंडे  | Published: September 04, 2023 11:49 AM

''गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारण्यांसाठी जीव गमवू नका''

जालना : तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. त्यांना आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. ज्यांनी लाठीमार केला त्यांना मराठवाडा बंदी करा. माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे फिरकू देवू नका. मराठा आरक्षणासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह तज्ज्ञांशी बोलू. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर नक्की त्यासाठी प्रयत्न करू. गेंड्याची कातडी असलेल्या या लोकांसाठी जीव गमवू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी सोमवारी सकाळी राज ठाकरे यांनी संवाद साधून माहिती घेतली. त्यानंतर उपोषणस्थळी उपस्थित नागरिकांसामोर ठाकरे बोलत होते. ज्या ज्या वेळी मी काही गोष्टी सांगितल्या त्या त्या वेळी त्या तुमच्यापर्यंत चुकीच्या पोहोचविण्यात आल्या. मोर्चे निघत होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे सांगितलं होते. ते सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मते घेतील दुर्लक्ष करतील असे सांगितले. सुप्रिम कोर्टाने आरक्षणाबाबत निकाल दिला आहे. विरोधात असले की मोर्चे काढायचे आणि सत्तेत गेले की गोळीबार करायचा, लाठ्या मारायच्या. तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. पोलिसांना कोणी आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. पोलिस काय करणार ते तुमच्या आमच्यातले आहेत. जे वरून सांगितले ती गोष्ट करावी लागणार. त्यामुळे तुमच्यावर ज्या लोकांनी लाठ्या बरसावल्या, गोळीबार केला. त्यांना मराठवाडा बंदी करा. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे पाऊल टाकू देवू नका. असे आवाहनही ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री आणि तज्ज्ञांशी बोलतो. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर नक्की सोडविला जाईल. तुम्ही गेंड्यांच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. एकजण मेला तर त्यांना फरक पडत नाही. पण जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. निवडणूक येतील तेव्हा अशा काही गोष्टी समोर आणतील. तेव्हा काठीचे पाठीवरील वळ लक्षात ठेवा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. यावेळी अमित ठाकरे यांची उपस्थिती होती.

फडणवीस यांच्यावर हल्लाबोलमाता-भगिनींवर झालेला लाठीमार पाहून मी येथे आलो आहे. मला राजकारण करायचे नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस राजकारण करू नये म्हणतात. तुम्ही विरोधी पक्षात असते तर काय केले असते असा सवाल करीत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

गडकिल्ले महाराजांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात उभा करायचा म्हणत त्यांनी मते मागितली. समुद्रात जावून फुलं टाकली. तेव्हापासून सांगतोय हा पुतळा होवू शकत नाही. समुद्रात पुतळा उभा करणे अशक्य गोष्ट आहे. महाराजांचे स्मारक हे आपले गडकिल्ले आहेत. त्यांना टिकवा. आपला राजा कसा होवून गेला ते पुढच्या पिढ्याला दाखिवले पाहिजे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण