लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : समाजातील अंधकार, अज्ञान, भेदाभेद घालवण्यासाठी संताचे कार्य मोलाचे ठरते.संत सेवालाल महाराजांनी सुध्दा समाजातील अज्ञान, अंधकार आणि व्यसनाधिनता घालवण्यासाठी मोठे कार्य केले, असे उदगार श्रीक्षेत्र अमरगड येथील संत शिवचरण महाराज यांनी येथे केले.येथील संत सेवालाल सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू नाईक , स्वागताध्यक्ष माजी आमदार धोंडीराम राठोड , रायसिंग महाराज, माजी जि.प. सभापती राजेश राठोड आदी होते.मंठा टी-पॉइंटपासून समाजबांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो समाजबांधव व भगिनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. डफड्याच्या तालावर महिला व पुरुषांनी पारंपरिक नृत्य केले. मिरवणुकीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन गोर बंजारा बांधवांना शुभेच्छा दिल्या. मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.आ. धोंडीराम राठोड म्हणाले की, प्रत्येक समाजातील संतांनी वाईट प्रथा घालवण्यासाठी व सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी कार्य केले. बंजारा समाजबांधवांनी एकत्रित राहून आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजे. यावेळी राजू नाईक यांनी बंजारा बांधवांनी शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहावे. असे सांगितले. याप्रसंगी रायसिंग महाराज, राजेश राठोड , मोहन जाधव , उद्धव पवार, श्रीचंद राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय राठोड यांनी केले. आभार हरिभाऊ चव्हाण यांनी मानले. यावेळी अविनाश चव्हाण , संजय राठोड , डॉ. मुकेश राठोड , बाबा राठोड , नितिन राठोड , के. जी. राठोड, सचिन राठोड , सुदाम राठोड , भाऊ जाधव, नंदू महाराज यांच्यासह हजारो समाजबांधवांची उपस्थिती होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
बंजारा समाजाने एकदिलाने कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:55 AM