लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा बसवेश्वर यांची जयंतीनिमीत्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, संघटना, शासकीय, निमशासकीय कार्यालयांत अभिवादन करण्यात आले.शंकरराव तौर प्राथमिक शाळाकुंभार पिंपळगाव : यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.पी. चव्हाण होते . तर प्रमुख पाहुणे व्ही.ए. शिंदे हे उपस्थित होते. एम.एम. अवचार, एन.व्ही.खिस्ते, डी.एम. सांगळे, बी.एम.साबळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन व्ही.एन. काळे यांनी तर बी.एम.साबळे यांनी आभार मानले.देवी रेणुका माध्यमिक विद्यालयकार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आर.आय आर्दड यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. संचालन एस.बी पवार यांनी केले. तर के.ई. सरोदे यांनी आभार मानले.शरद पवार माध्यमिक विद्यालयघनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथील शरद पवार माध्यमिक विद्यालयात एस.एस. नाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे एस.एस.नाडे तर प्रमुख पाहुणे एस.के. कायंदे आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांनी संत बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कृषी उत्पन्न बाजार समितीजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांच्या हस्ते बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसचिव रजनिकांत इंगळे, मोहन राठोड, अनिल खंडाळे, प्रसाद काकडे, कन्नू पाटणी, संजय जाधव, प्रकाश पोळ, राजू निहाळ, संजय छबिलवाड उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बसवेश्वर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:54 AM