लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आपत्ती व्यवस्थापन समितीकडून मान्सूनपूर्व आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली. त्यात भविष्यातील पावसाळा लक्षात घेऊन नेमकी कोणकोणती तयारी प्रशासनाकडून अपेक्षित आहे, यावर चर्चा करण्यात येऊन आठही तालुक्यातील तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या.बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, प्रभारी जिल्हाधिकारी पी. बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार डॉ. बिपीन पाटील, जे. डी. वळवी, दत्ता भारस्कर यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कडलक, बनसोड, औरंगाबाद येथील भूदलाचे अधिकारी कर्नल हिमांशू आदींसह अन्य खाते प्रमुखांची उपस्थिती होती.बैठकीत आपत्ती निवारण कक्षाचे खान, दीपक काजळकर यांनी आपत्ती निवारण आराखडा तयार करताना कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा या बद्दल सांगितले. त्यात नदीची पूररेषा निश्चित करणे, पूर आल्यास गावातील चांगले पोहता येणाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करणे, तसेच शाळा, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वेळ पडल्यास स्थलांतर करण्यासाठीचे नियोजन आदींसह अन्य महत्वपूर्ण बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन ३१ मे पर्यंत तालुका निहााय आपत्ती निवारण योजनांचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी खपले यांनी दिले.
नैसर्गिक आपत्तीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:59 AM