लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळ निवारण्यासह टँकरमुक्त गाव तसेच जलयुक्त गाव यासाठी लाखो रूपये शासन खर्च करत आहे. त्यामुळे एखाद्या गावात खरोखर कुठल्याही योजना नसतील आणि पाणी टंचाई असेल तर तेथे टँकर हा पर्याय असू शकतो. मात्र सर्व योजना राबवूनही जर त्या गावात टँकरने पाणी पुरवावे लागत असेल तर ही बाब गंभीर असून, अशी वेळ का आली याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच ग्र्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेच्या कामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुरूवारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत दिले.जालना आणि बदनापूर तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक येथील सेंटमेरी हायस्कूलमध्ये पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जालन्याचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील, बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाºयाचंी उपस्थिती होती. यावेळी बिनवडे यांनी सांगितले की, दुष्काळ आणि टंचाई तसेच चारा टंचाई, गावातच शेतक-यांच्या हाताला काम देणे यासह अन्य महत्वाच्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे रोजगार हमी योजनेच्या कामांचे नियोजन करण्याचे निर्देश यावेळी दिले. यावेळी बिनवडे आणि अरोरा यांनी दिले. बैठकीत समस्यांही जाणून घेतल्या.
दुष्काळात संवेदनशील राहावे -रवींद्र बिनवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:53 AM