लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम पार पडला. यात जालन्यातील उद्योगपती मंजूकुमार भक्कड यांची मुलगी तसेच भाऊ आणि जावई सहभागी झाले होते. या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमात जालन्यातील परिवाराला ही संधी मिळाल्याने त्याचे जालन्यात सर्वत्र स्वागत होत आहे.या संदर्भात जालन्यातील मंजूकुमार भक्कड यांची मुलगी मुयरी भक्कड-सारडा आणि त्यांचे पती हे गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. सारडा यांची स्वतंत्र कंपनी तेथे आहे. ते तेथील विविध सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या हाऊडी मोदी कार्यक्रमाचे नियोजन हे दोन महिन्यांपूर्वीपासून सुरू होते. ह्यूस्टनसह परिसरात मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाचे नागरिक राहातात. त्याच मुळे या भागात हा कार्यक्रम आयोजित केल्याचे मयुरीने लोकमतशी बोलताना सांगितले.आपल्या देशाचे पंतप्रधान येणार असल्याने भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यातच या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने दोन्ही देशांमध्ये संवादाचे वातावरण निर्माण झाल्याची भावना मयुरीने व्यक्त केली. माझे पती विनय सारडा यांनी या कार्यक्रमात महत्वाची जबाबदारी उचललली होती. त्यांच्याकडे मीडिया मॅनेजमेंट सोपवण्यात आले होते. या हाऊडी मोदी कार्यक्रमात जालन्यातील शांबाबाई विजयकुमार भक्कड, ममता महेंद्रकुमार भक्कड, अर्चना भक्कड, अशोक भक्कड, आयुष भक्कड यांनाही सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आनंद व्दिगुणित झाला आहे.
‘हाऊडी’ मोदींच्या कार्यक्रमात भक्कड परिवाराचा सहभाग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:22 AM