भोकरदन (जालना ) : शेतकऱ्यांचा कापूस विकून त्याचे पैसे घेवून पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यास भोकरदन पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कैलास ज्ञानेश्वर गाढवे (२४, रा. मासरूळ ता. जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.
मी कापसाचा दलाल म्हणून काम करतो. मी तुमाचा कापूस जास्त भावाने गुप्तेश्वर जिनिंग येथे विकून देतो. असे सांगून शेतकरी नानासाहेब देठे (रा. नळणी रा. भोकरदन) यांचा कापूस विकून ६७ हजारांची फसवणूक करुन आरोपी कैलास गाढवे पैसे घेवून पळून गेला. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास करत असतांना हा आरोपी औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसीमध्ये असल्याचा माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, कर्मचारी जी. यू. गायकवाड, संदिप उगले, विजय जाधव यांनी केली.