लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसासह पावसाळ्यातही भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामूळे पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यातच सर्वात पिकांचे नुकसान हे या दोन तालुक्यात झाले आहे. या दोन तालुक्यांना अनुक्रमे १८ कोटी ७२ लाख आणि १२ कोटी १२ लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.परतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका सोयाबीन आणि मका पिकाला बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन चार लाख ८० हेक्टरवरील नुकसान झाले होते. यानुसार शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी २१ लाख रूपये मिळाली आहे. या ११० कोटी २१ लाख रूपयांमधून जिल्ह्यातील आठ तालुक्यांना त्यांच्या नुकसानीच्या तुलनेत मदत वर्ग करण्यात आली आहे. त्याचा तपशीलही बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात भोकरदन आणि जाफराबादसह जालना तालुका १७ कोटी ६३ लाख, बदनापूर नऊ कोटी ९१ लाख, परतूर ११ कोटी २ लाख, मंठा नऊ कोटी ९१ लाख, अंबड आणि घनसावंगीसाठी अनुक्रमे १५ कोटी ४३ लाख रूपयांची मदत मिळणार आहे. राज्यात परतीच्या पावसाने जे नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १३ मे २०१५ चा अध्यादेश ग्राह्य धरला आहे. त्यानुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० रूपये तर, बागयायती शेतक-यांच्या नुकसानीपोटी आठ हजार रूपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. ही वाटपाची प्रक्रिया आता गतीने व्हावी ही शेतकºयांची मागणी आहे.परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्यपालांनी पुढाकार घेऊन ही मदत जाहीर केली आहे. ही मदत जाहीर झाल्यावर तिचे वाटप हे संबंधित शेतकºयांना तातडीने करण्यासाठी बँकांनी तसेच अधिकाºयांनी तत्परता दाखवावी.तसेच आलेले अनुदान बँकांनी त्यांच्याकडे ठेवू नये, नसता हा तात्पुरता गैरव्यवहार समजून गुन्हे दाखल करण्यात येतील असेही शासनाने काढलेल्या अध्यादेशात नमूद केले आहे. तसेच या अनुदानाच्या रकमेतून कुठल्याही बँकेने शेकºयांचे कर्ज कापून घेऊ नये, असेही स्पष्ट निर्देश दिले आहेत.
भोकरदन, जाफराबाद तालुक्यांना मिळणार सर्वात जास्त अनुदान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:52 AM