शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

खडसेंना मोठा धक्का! जिल्हा दुध संघाने १० कोटींच्या निधीचा अतिरिक्त खर्च केल्याचा ठपका, कार्यवाहीचे आदेश  

By ajay.patil | Published: August 19, 2022 10:10 PM

राज्यात भाजप व शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर गेल्याच महिन्यात दुध संघातील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ बसविण्यात आले होते.

अजय पाटील -

जळगाव: जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करता व शासनाची मान्यता न घेता, परस्पर निर्णय घेवून, ९ कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीचा अतिरीक्त खर्च केला, असा ठपका राज्य शासनाकडून ठेवण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणी संचालक मंडळावर कार्यवाही करुन त्याचा अहवाल १५ दिवसात पाठवण्याच्या सूचनाही शासनाचे उपसचिव नि. भा. मराठे यांनी सहकारी संस्था दुग्ध विभागाच्या सहनिबंधकांना दिल्या आहेत. या आदेशामुळे विद्यमान संचालक मंडळासह चेअरमन मंदा खडसे, आमदार एकनाथ खडसे यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

राज्यात भाजप व शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर गेल्याच महिन्यात दुध संघातील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ बसविण्यात आले होते. तसेच नागराज पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने व गिरीश महाजन यांच्या मागणीनुसार शासनाने दुध संघातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या चौकशी समितीने प्राथमिक चौकशी करत, दुध संघातील मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकरण प्रकल्पावर मंजूर तरतुदीपेक्षा ५ कोटी ९२ लाख व दुग्धजन्य उपपदार्थ प्लॅन्टचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण या प्रकल्पावर ३ कोटी ९९ लाख, असा एकूण ९ कोटी ९७ लाखांचा अतिरिक्त खर्च शासनाची परवानगी न घेताच करण्यात आला असल्याचे आढळून आले आहे. दुध संघात मुख्य दुग्धशाळा व दुग्धजन्य उप पदार्थ प्लॅन्टचे विस्तारीकरण व आधुनिकीकरणात अनियमितता होवून निधीचा गैरवापर झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मंजूर किमतीपेक्षा जास्त खर्च -प्रकल्पाची अंमलबजावणी करताना संघाने डिपीआरमध्ये समावेश असलेल्या घटकांप्रमाणे खर्च न करता अतिरिक्त घटकांचा देखील डीपीआरमध्ये समावेश केला नाही. त्यात मंजूर असलेल्या कामांवरील खर्चात झालेल्या बचतीचा वापर अतिरिक्त घटकांवर करण्यात आला आहे. काही अपरिहार्य कारणास्तव बदल करावयाचे असल्यास प्रथमतः शासन मान्यता घेणे आवश्यक ठरते. मात्र, तसे करण्यात आलेले नाही. डिपीआरमधील काही घटक रद्द केल्यामुळे व नविन घटकांचा समावेश केल्यामुळे मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरण या प्रकल्पावर मंजूर तरतूदीपेक्षा जास्त खर्च झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच संघाने खर्चात झालेल्या बचतीचा ५० टक्के वाटा शासनास परत करणे अभिप्रेत असतांना प्रकरणांमध्ये १४ कोटी ५३ लाखाची बचत झाल्यावरही ७ कोटी २६ लाख शासनास परत केले नाही. ही आर्थिक अनियमितता विचारात घेऊन शासनाने ही रक्कम वसूल करून शासनाकडे समायोजित करावी, असे देखील शासनाच्या आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव