शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

भाजप,सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग; महायुतीचे पाच आमदार तरीही जालन्यात काँग्रेसचा विजय

By विजय मुंडे  | Published: June 06, 2024 7:46 PM

दोन वेळा आमदार, पाच वेळा खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असणारे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पराभवाचा झटका

जालना : जालना लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार आणि काँग्रेसचा केवळ एकच आमदार आहे. परंतु, मंगळवारी लागलेल्या निकालात महायुतीचे पक्षीय बलाबल केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून आले. दोन वेळा आमदार, पाच वेळा खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असणारे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पराभवाचा झटका देत डॉ. कल्याण काळे यांनी २८ वर्षांनंतर जालना लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकावीत कार्यकर्त्यांसह गुलाल उधळला.

जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच मतदारसंघात चुरस दिसून आली. प्रचार यंत्रणेत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, मविआचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी नेत्यांच्या सभा आयोजित करण्यासह बूथनिहाय अधिकाधिक मतदान करून घेण्याचे नियोजन केले होते. या मतदारसंघात भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे सुपत्र आ. संतोष दानवे, बदनापूरमध्ये भाजपचे आ. नारायण कुचे, फुलंब्री येथे भाजपचे माजी सभापती आ. हरिभाऊ बागडे हे आहेत, तर पैठणमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे, आणि सिल्लोड येथे शिवसेना शिंदे गटाचे आ. अब्दुल सत्तार आहेत.

या पाचही आमदारांनी, मंत्र्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या जाहीर सभांमधून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना अधिकाधिक मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ४ जूनला लागलेल्या निकालात महायुतीचे आमदार आणि मंत्री असणाऱ्या एकाही विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांना मताधिक्य मिळाल्याचे दिसत नाही. विशेषत: पैठण, फुलंब्री, सिल्लोड या मतदारसंघातून २७ हजारांहून अधिक मताधिक्य काळे यांना मिळाले आहे. आ. नारायण कुचे यांच्या बदनापूर मतदारसंघातून १३ हजार ४७२ आणि दानवे यांचे होमपीच आणि मुलगा संतोष दानवे आमदार असणाऱ्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातूनही काळे यांनाच ९६२ मतांची लीड मिळाली आहे.

विधानसभेवर होणार परिणामजालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन हे विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. येथे मविआला मताधिक्य मिळाले आहे. फुलंब्रीत भाजप, तर पैठण, सिल्लोडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यातील बदनापूर, भोकरदन, फुलंब्री या भाजपच्याच मतदारसंघात बदलाचे वारे अधिक दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे आपला गड ताब्यात ठेवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, तर सिल्लाेडमध्ये सतत पक्ष बदलणारे अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे तेथे अधिक बदलाचे वारे राहतील, असे चित्र सध्या तरी नाही.

विधानसभा- कल्याण काळे- रावसाहेब दानवे- मंगेश साबळे- प्रभाकर बकलेजालना-९३,७५६- ८३,९६६-६,०८६- ९३६२

बदनापूर-१,०२,९५९- ८९,४८७-१९,९५४- ५४९८भोकरदन- १,००,०१३- ९९,०५१- १९,९०५- ३६९४

सिल्लोड- १,०१,०३७- ७३,२७८- ४१,३४३- ६३००फुलंब्री- १,१२,७२०- ८२,८६४- २८,६६४- ७५७९

पैठण- ९५,०१९-६७,१६३- ३९,३८३-५२४५पोस्टल- २३९३-२१३०-५९५- १३२

एकूण-६,०७,८९७- ४,९७,९३९- १,५५,९३० -३७,८१०

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Kalyan kaleडॉ. कल्याण काळे