शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
2
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
3
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
4
Jamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर; गिरीश महाजन सातव्यांदा विजयी होणार?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
10
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
12
Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी
13
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे
15
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
18
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
19
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
20
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!

जालना जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची जादू की, भाजपकडून दिला जाणार धक्का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:43 AM

राज्यातील सत्तांतरण नाट्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यातील सत्तांतरण नाट्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. निवडीसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया होणार असून, भाजपा व महाविकास आघाडीकडून ‘आमच्याकडे बहुमत आहे’ असा दावा केला जात असून, दोन्ही गटातील पक्षनेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्तेच्या सारिपाटावर फोडाफोडी होऊ नये म्हणून सदस्यांनाही सहलीवर पाठविण्यात आले आहे.जालना जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य असून, जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी २९ सदस्यांची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाकडे २२, सेनेकडे १४, राष्ट्रवादीकडे १३, काँग्रेसकडे ५ आणि अपक्ष २ असे एकूण ५६ सदस्य आहेत. अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून साष्टी पिंपळगाव सर्कलचे राष्ट्र्वादीच्या नितू संजय पटेकर, शिवसेनेकडून वरूड सर्कलचे उत्तम वानखेडे यांची नावे चर्चेत आहेत. तर उपाध्यक्षपदावर विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही नजर ठेवून आहेत. भाजपकडून अध्यक्षपदासाठी कोकाटे हदगाव सर्कलच्या सदस्या वैजयंती प्रधान, कराड सावंगी सर्कलच्या रेणुका हनवते तर उपाध्यक्षपदासाठी आशा पांडे, राहुल लोणीकर, अवधुत खडके, डॉ. चंद्रकात साबळे, शालीराम म्हस्के यांच्या नावांची चर्चा आहे.राज्यात भाजपा- शिवसेनेत काडीमोड होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र, जालना जिल्हा परिषदेत यापूर्वीच भाजपाला बाजूला करून महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली होती. हीच आघाडी कायम रहावी, यासाठी वरिष्ठस्तरावरून सूचना आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल यांनी प्रयत्न सुरू केल्या आहेत. तर जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकाविण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. सदस्यांची फोडाफोडी होऊ नये म्हणून सर्व सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. असे असले तरी दोन्ही गटाकडून बहुमत आपल्याकडेच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ऐनवेळी राजकीय नाट्य घडणार की पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत येणार ? याकडे लक्ष लागले आहे.फोडाफोडीच्या राजकारणात भाजप आक्रमकभाजपने महाविकास आघाडीचे सदस्य फोडल्याचा दावा केला आहे. यात शिवसेना ३, राष्ट्रवादी २ काँग्रेस २ सदस्य फोडल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. परंतु, महाविकास आघाडीने गेलेले सर्व सदस्य परत आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज कोणत्या पक्षाने किती सदस्य फोडले हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भाजपचे अरविंद चव्हाण हे महाविकासआघाडी सोबत असल्याची चर्चा आहे.अशी होणार मतदान प्रक्रियाजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. दुपारी १ वाजता सभेला सुरूवात होणार आहे. १ वाजल्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी १.१५ ते १.३० वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेणे तर दुपारी १.३० वाजण्याच्यानंतर आवश्यकता असल्यास मतदान घेऊन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदElectionनिवडणूकPoliticsराजकारण