भाजपच्या जिल्हा कार्यालयात ही आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे, आ. नारायण कुचे, शहराध्यक्ष राजेश राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बावनकुळे यांनी प्रत्यक्षात निवडणुकीची तयारीही आतापासून केल्यास ऐन निवडणुकीत गोंधळ उडत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून ती किती फायदेशीर आहे. हे विशेष करून सांगावे, तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर जनतेची कशी दिशाभूल करत आहे, हेही सांगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी संतोष दानवे यांनी जिल्ह्याचा आढावा सादर केला. यावेळी भाजपा जालना जिल्हा कोअर कमिटी सदस्य जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, माजी आ. विलास खरात, रामेश्वर भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, विलास नाईक, अशोक पांगारकर, राहुल लोणीकर, अतिक खान, संध्या देठे, अनिल कोलते, राजेश राऊत, अरुण उपाध्ये, कपिल दहेकर आदींची उपस्थिती होती.
फोटो
जालना : भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. यावेळी आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, शहराध्यक्ष राजेश राऊत आदी.