जालना : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्यावतीने बुधवारी जिल्हाभरात निषेध आंदोलन करण्यात आले. जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुका आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. राज्य सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणूनबुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल डेटा दिला नाही व आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलही दिला नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही, असा आरोप करीत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनात भाजपच्यावतीने जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, आ. नारायण कुचे, प्रदेश सदस्य रामेश्वर भांदरगे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, संध्या देठे, सुनील आर्दड, नगरसेवक सतीश जाधव, शशिकांत घुगे, भाजयुमो शहराध्यक्ष सुनील खरे, बाबासाहेब कोलते, ओबीसी युवक जिल्हाध्यक्ष रोहित नलावडे, सुनील पवार, सोमनाथ गायकवाड, सोमेश काबलीये यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन
भोकरदन येथे भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे व तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. जाफ्राबाद येथे सुरेश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बदनापूर येथे आ.नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अंबड येथे आ.नारायण कुचे व तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. घनसावंगी येथे विश्वजित खरात व तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. परतूर व मंठा माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाटूर फाटा व परतूर-घनसावंगी येथे ‘चक्का जाम आंदोलन’ करण्यात आले.