लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर रेल्वे स्थानका समोर पाच ते सहा दिवसापासून ‘बेवारस’मारूती सुझूकी कार उभी असून, आतमध्ये काठया, चाकू, कमरेचा बेल्ट व गोठलेल्या रक्ताचे डाग दिसत असल्याने ही गाडी खून प्रकरणात वापरण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.परतूर रेल्वे स्थानक सतत अनेक गुन्हेगारी घटनांनी गाजत आहे. या ठिकाणी रेल्वे पोलिस चौकी देण्यात आली आहे. मात्र या चौकीतील पोलीस नावलाच असल्याचा प्रत्यय येत आहे. या स्थानकाच्या उजव्या बाजूला एक निळसर भुरकट रंगाची मारूती सुझूकी (क्र.एम. एच. १५ बीडी.६८०१) ही नाशिक जिल्हा पासिंंग असलेली कार सहा दिवसापासून बेवारसपणे उभी आहे. या गाडीत मोठया चार फु टी बांबूच्या दोन काठ्या, एक चाकू, कमरेचा बेल्ट, गोठलेल्या रक्ताचे डाग दिसत आहेत. तसेच उलटी केलेल्या खुणा, एक लहान मुलाचा हिरवट रंगाचा चौकडा शर्ट दिसत आहे. या गाडीच्या चारही चाकांची हवा सोडण्यात आली आहे. ही गाडी एखाद्या खून प्रकरणात वापरण्यात आली असावी, अशीही शंका व्यक्त होत आहे. रविवारी या गाडीबद्दल रेल्वे स्टेशन परिसरात कुजबूज सुरू झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते.
परतूर रेल्वे स्थानकासमोर काठ्या, रक्ताचे डाग असलेली बेवारस कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:44 AM