लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालकुमार महोत्सवासारख्या उपक्रमातून मुलांच्या भावविश्वात रमण्यासारखा निर्मळ आनंद पैशाने मोजता येत नाही, असे प्रतिपादन बालसाहित्यिक प्रशांत गौतम यांनी सोमवारी येथे केले.अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला जालनातर्फे येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात आयोजित बालकुमार महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. त्या वेळी ते बोलत होते.यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षा डॉ. छाया महाजन, रौप्य महोत्सव समितीचे सल्लागार विजय देशमुख, गणेश जळगावकर, डॉ. नारायण बोराडे, कल्पना हेलसकर, डॉ. सुजाता देवरे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, कार्यवाह आर. आर. जोशी, जगत घुगे, डॉ. यशवंत सोनुने, बाबासाहेब हेलसकर, संतोष मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.गौतम म्हणाले की, आज तंत्रज्ञानाच्या युगात माणसामाणसातील संवाद हरवत चालला आहे. एकीकडे व्हॉटसअप, फेसबुक, इंटरनेटसारखी माध्यमे असली तरी संवाद हरवत चालल्याने माणूस हरवतो की काय, अशी स्थिती आहे.कुटूंब, समाज आणि समूहातील विसंवाद कमी होऊन सुसंवाद व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.बालकुमार समारोप समारंभात राज्य शासनाचा बालसाहित्यिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. विशाल तायडे यांचा सत्कार करण्यात आला. चित्रकार मुकुंद दुसे, चित्रकार सुनील पवार, संतोष जोशी, रामदास कुलकर्णी, जगदीश कुडे या मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.संतोष लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले, तर आर.आर. जोशी यांनी आभार मानले. बालकुमार महोत्सव आयोजनासाठी संतोष मुसळे, संदीप इंगोले, पांडुरंग वाजे, शुभांगी लामधाडे, सुवर्णा मगर, अख्तरजहॉ कुरेशी आदींनी प्रयत्न केले.महोत्सवात घेण्यात आलेल्या अभिनय संवाद स्पर्धेत वैष्णव वाढेकर याने प्रथम, वरद जोशी याने द्वितीय, तनिष्का खेरुडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेत संस्कार प्रबोधिनी विद्यालयाची विद्याथीर्नी वैष्णवी इंगळे हिने प्रथम क्रमांक मिळविला.तनिष्का खेरुडकर हिने द्वितीय तर बद्रीनारायण बारवाले विद्यालयाचा विद्यार्थी वैभव चंद याने तृतीय क्रमांक मिळविला. रंगभरण स्पर्धेत दीपाली मगर, प्रितेश लिंगायत, रुचिरा जोशी, श्रावणी हेलसकर, ऐश्वर्या पाडोळे, साक्षी गायकवाड, पार्थ मगर, वैष्णवी खंदारे, तनिष्का खेरुडकर, वैष्णवी इंगळे, प्रियंका पघळ, माया पाडळे यांनी पारितोषिके पटकावली.युवक कीर्तनकार भक्ती दीपक रणनवरे हिने केलेल्या सानेगुरुजींच्या जीवनावरील कीर्तनाने महोत्सवात अधिक रंगत आली. स्पधेर्चे परीक्षण डॉ. यशवंत सोनुने, संजय निकम, प्रा. दत्ता देशमुख, मुकुंद दुसे, संतोष जोशी यांनी केले.
मुलांच्या भावविश्वात रमण्यात निखळ आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:04 AM