जालना : कोरोना संसर्गाचा फैलावत असलेल्या उद्रकेता रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरु केलेला रक्तदानाचा उपक्रम हा जीवनदायी म्हणावा लागेल. असेच सामाजिक उपक्रम राबविणे हीच महामानवांना खरी आदरांजली ठरेल .असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी बुधवारी येथे बोलताना केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेच्या वतीने अंबड रोड वरील सतकर कॉम्प्लेक्स परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात चाळीस युवकांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विनायक देशमुख बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर ,सुनील साळवे, अण्णासाहेब चित्तेकर, बाबुराव सतकर, दीपक डोके, बाला परदेशी,मनोज कोलते,संघटनेचे संस्थापक कपिल खरात, सचिव संदीप साबळे, दिलीप कांबळे,विलास रत्नपारखे,विजय लहाने, कैलाश रत्नपारखे,भास्कर बोर्डे, राहुल खरात,यांची प्रमुख उपस्थिती होती
सूञसंचालन संदीप साबळे यांनी केले तर राहुल खरात यांनी आभार मानले.
________________
_