लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास रक्ताची टंचाई कधीच पडणार नाही, हे माहीत असतानाही फार कमी लोक स्वत:हून समोर येतात. यातच उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरतो. या वर्षी अशीच स्थिती निर्माण झाल्याने शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी अडचणीत आहेत.सध्याच्या स्थितीत जिल्हा रुग्णालयात ५३ पिशव्या रक्त उपलब्ध आहेत. या रुग्णालयातून दररोज ७ ते ८ रक्तपिशव्यांची मागणी असते. यामुळे दहा दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याने ‘रक्त देता का रक्त’ अशी आर्त हाक या रक्तपेढींने दिली आहे.सामान्य रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. घाटीत अपघाताचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी विविध शस्त्रक्रियांसाठी आणि थॅलेसेमिया, अॅनेमियासह इतर आजारांसाठी रक्त, रक्तघटकांची आवश्यकता असते. घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास ७ ते ८ पिशव्या रक्त आणि रक्तघटकांची मागणी असते; परंतु सध्या ५३ पिशव्याच रक्तसाठा उपलब्ध असून हे रक्त दहा दिवस पुरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुणी रक्त देता का रक्त..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:39 AM