शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शेतीच्या वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:14 AM

बहिणीकडील शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी/देऊळगावराजा : बहिणीकडील शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.बुटखेडा येथील दीपक दिलीप साबळे (३५) यांची विधवा बहिण तिचे सासर उम्रद (ता. जालना) येथे राहत होती. दरम्यान बहिणीसोबत तिच्या चुलत दिराचे शेतीचे भांडण सुरू होते. हा वाद मिटविण्यासाठी दीपक साबळे आपल्या कुटुंबातील इतरांसोबत शनिवारी उम्रद येथे गेला होता. वाद मिटला म्हणून ते सर्व आपले गाव बुटखेड्याकडे परत आले. मात्र दीपक सोबत बहिणीचे चुलत दीर व इतर तिघे - चौघे देवळगावराजा पर्यंत आले. सायंकाळी दीपक साबळे देऊळगावराजा येथून आपले गाव बुटखेडा कडे निघाले असता देऊळगावराजा येथील कस्तुरबा हायस्कूल च्या थोडे पुढे आल्यानंतर बहिणीचे चुलत दीर भाऊसाहेब शिंदे व हिरासाहेब शिंदे यांनी दीपकवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात दीपक जागीच ठार झाला.दरम्यान मयताचा भाऊ प्रमोद साबळे याने नोंदविलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध देऊळगावराजा येथे गुन्हा नोंद आहे.दीपक साबळे हा तरूण गावच्या सामाजिक कामात नेहमीच हिरीरीने भाग घ्यायचा. खेळाडू असलेल्या दीपक मध्ये नेतृत्वगुण होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोघे भाऊ, असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बुटखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस