लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात दत्ता चंद्रभान उढाण या युवकाचा गळा चिरुन मंगळवारी खुन करण्यात आला. हा खुन पैशाच्या देवाण घेवाणीवरुन त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांना बुधवारी न्यायलयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.रामजनम भारतवाज, अमोल अंभोरे, रमेश देवकर (तिघे रा. चंदनझिरा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोमवारी रात्री ९ वाजेपासून दत्ता हा घरातून निघून गेला होता. (पान तीनवरून) तिघात पैशाच्या देवाण घेवाणीवरुन वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. हा वाद मिटल्यानंतर ते सर्वजण एका जागरणाच्या कार्यक्रमात गेले. तेथेही त्यांनी गोंधळ केला. त्यानंतर ते एका दारुच्या दुकानात गेले. परंतु, दुकानादारांने दारू देण्यास नकार दिल्याने त्यांनी दारुचा ड्रम चोरून नेला. त्यानंतर १ ते २ दोन वाजेच्या दरम्यान, त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली.यात रामजनम भारतवाज, अमोेल अंभोरे, रमेश देवकर यांनी दत्ताच्या शरीरावर चाकूने वार केले. यानंतर दत्ता हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाला असता, त्यांनी आयटीआय परिसरात त्याचा गळा चिरला. आणि तेथून फरार झाले.५ तासात आरोपी ताब्यातसकाळी साडेआठ वाजता पोलिसांना घटनेची महिती मिळाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोनि. यशवंत जाधव, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळाची पाहाणी करून आरोपींचा शोध सुरु केला. या तिन्ही आरोपींना पाच तासात ताब्यात घेतले.
पैशाच्या देवाण- घेवाणीवरुन केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:15 AM
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात दत्ता चंद्रभान उढाण या युवकाचा गळा चिरुन मंगळवारी खुन करण्यात आला. हा खुन पैशाच्या देवाण घेवाणीवरुन त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.
ठळक मुद्देचंदनझिरा : पाच तासात लावला तपास