लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिव-दमण परिसरातून स्वस्त किंमतीत विदेशी मद्य आणून त्याचे लेबल बदलून ती विक्री करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, ११ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने जालन्यातील एका हॉटेल तसेच ढाब्यावर कारवाई करत बनावट दारूचे बॉक्स जप्त केले होते. त्या प्रकरणात जालन्यासह बीड, बुलडाणा जिल्ह्यातून आणखी तीन आरोपींना अटक केले होते. त्यांच्याकडून विदेशी दारूचा तसेच महाराष्ट्रात विक्रीवर बंदी असलेल्या दारूचा साठा तसेच त्यासाठी वापरलेली वाहने जप्त करण्यात आली. या प्रकरणी प्रारंभी गुन्हे शाखेने यातील जुगल लोहिया, मुकेश राऊत आणि अरूण श्रीसुंदर यांना अटक केली होती.त्यांच्याकडूनही विदेशी मद्याचा साठा जप्त केला होता. ्यांना प्रथम न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत रविवारी संपली होती. त्यामुळे रविवारी या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ११ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे गौर यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी बरेच धागेदोरे समोर येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली.दरम्यान, या तीन आरोपींसह बीड येथून अटक केलेल्या आरोपीकडून भिंगरी दारू आणून त्याची दुस-या बाटल्यामध्ये भेसळ करण्यात येत होती काय, या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.जालना : उत्पादन शुल्कचेही लक्ष हवेपोलिसांनी कारवाई करत जालन्यात बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. ही दारू बनावट आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान या दारूचे नमुने घेऊन उत्पादन शुल्कने त्याची खात्री करण्याची गरज आहे. नसता केवळ महसूल गोळा होत असल्याने लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता उत्पादन शुल्ककडेही लक्ष लागून आहे.
आणखी मासे गळाला लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:26 AM